२ हजारासोबत ५०० आणि १०० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करा, ‘या’ नेत्यानं नेमकी काय केली मागणी?
VIDEO | नोटाबंदीचे स्वागत करत आता कुणी केली ५०० आणि १०० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची मागणी?
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आदेशानुसार, 2 हजाराच्या नोटा बँकेत जमा किंवा बदलून घ्यावं लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याचा निर्णय जाहीर केला आणि देशभरातून प्रतिक्रिया समोर आल्यात. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातील काही नेत्यांनी त्याचे स्वागत केले तर काहींनी नाराजी व्यक्त केली. अशातच या नोटाबंदीच्या निर्णयावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत सदाभाऊ खोत म्हणाले, भारत सरकारला विनंती करतो की, पाचशे आणि शंभर रूपयांच्या नोटा देखील चलनातून काढून घ्याव्यात. ५०, २०, १० रूपयांच्या नोटा चलनात असल्याने ग्रामीण भागातील लोकं व्यवहार करू शकतात आणि मोठे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतात. प्रस्थापित आणि लुटारूंच्या घड्या जर उद्धवस्त करायच्या असतील तर काही बंधन आणावी लागतील. जर अशी बंधनं आणली तर सर्वसामान्य नागरिक सन्मानाने उभा राहिलं.