Rohit Pawar | नातू पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर, सदाभाऊ खोतांचा आजोबांवर निशाणा
जोबांच्या आवाहनानंतरी त्यांचे नातू आमदार रोहित पवार (Rohit Pawar) चिपळूणच्या दौऱ्यावर गेले. मग आजोबांचा सल्ला नातवाला मान्य नाही का? की हे सल्ले फक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच होते, असा खोचक सवाल माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी विचारला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे टाळण्याचं आवाहन केलं होतं. आजोबांच्या आवाहनानंतरी त्यांचे नातू आमदार रोहित पवार (Rohit Pawar) चिपळूणच्या दौऱ्यावर गेले. मग आजोबांचा सल्ला नातवाला मान्य नाही का? की हे सल्ले फक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच होते, असा खोचक सवाल माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी विचारला आहे.
पूरग्रस्त भागांचे दौरे टाळण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं खरं पण त्यानंतरही त्यांचे नातू रोहित पवार यांनी चिपळूणचा दौरा केला. कोकणात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. नेमका हाच धागा पकडत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी बोचरा सवाल उपस्थित केला. राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करून नयेत, असं आजोबांनी सांगितलं….. आजोबांच्या सल्ल्याला नातूच मानत नाही… कर्जत-जामखेडचे आमदार चीपळूणच्या दौऱ्यावर…. आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिता होता?, असा बोचरा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला.