Sadabhau Khot | एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या निर्णय घेणार, सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया

| Updated on: Nov 24, 2021 | 8:56 PM

ऐतिहासिक पगारवाढीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांची आजची रात्रही आझाद मैदानात जाणार आहे. संपाबाबत उद्या सकाळी 11 वाजता निर्णय घेऊ अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. मोठ्या घोषणेनंतरही संपाबाबत अजूनही तोडगा निघाला नाही. मुंबई, पुणे, नाशिकसह काही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय.

ऐतिहासिक पगारवाढीनंतरही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठी घोषणा केल्यानंतरही संपावर आजही तोडगा निघाला नाही. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 41 टक्के वाढ करणार असल्याची घोषणा केलीय. कर्मचाऱ्यांसाठी इन्सेटिव्ह योजना आणणार असल्याचं आश्वासनही सरकारकडून देण्यात आलंय. कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत देण्याबाबत खबरदारी घेणार आसल्याचंही अनिल परबांकडून सांगण्यात आलं.

गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा मुक्काम आझाद मैदानात आहे. त्यावर आजही तोडगा न निघाल्यानं कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची आजची रात्रही थंडीत जाणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं, त्यानंतर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं सांगितलं.

Anil Parab | कोणत्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती हजारानं वाढला?, जाणून घ्या
Gunratna Sadavarte | आमदारांची स्पष्ट फसवणूक झाली, आझाद मैदानातून गुणरत्न सदावर्तेंचा आरोप