रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यावर ईडीकडून कारवाई, किरीट सोमय्या यांची माहिती

| Updated on: Mar 10, 2023 | 11:47 AM

VIDEO | शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात किरीट सोमय्या यांनी नेमकं काय म्हटले...

मुंबई : साई रिसॉर्ट प्रकरणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली असून ईडीकडून देखील या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. सदानंद कदम यांना मुंबईला आणण्यात येणार असून त्यांची मुंबईतच कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील ईडी कार्यालयात सदानंद कदम यांची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, सदानंद कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. कदम यांना ताब्यात घेण्यात आल्याने अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या घटनेनंतर रामदास कदम काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Mar 10, 2023 11:45 AM
जात सांगितली तरच खत; केंद्राच्या निर्णयावर सतेज पाटील यांची सडकून टीका
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, भोपळा हाती घेऊन आक्रमक; बघा व्हिडीओ