40 ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांवर शरद पवारांचं मौन का? – सदावर्ते
शरद पवार म्हणाले की, माझ्या गेल्या 30-35 वर्षाच्या राजकीय जीवनात एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटनांशी मी चर्चा केली. त्यावेळी मान्यता प्राप्त युनियन चर्चा करण्यासाठी यायच्या. पण यावेळी आंदोलकांनी सर्व युनियन बाद केल्या आहेत.
शरद पवार म्हणाले की, माझ्या गेल्या 30-35 वर्षाच्या राजकीय जीवनात एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटनांशी मी चर्चा केली. त्यावेळी मान्यता प्राप्त युनियन चर्चा करण्यासाठी यायच्या. पण यावेळी आंदोलकांनी सर्व युनियन बाद केल्या आहेत. चर्चा करण्यासाठी कामगारांनी युनियनला अधिकार दिला नाही. त्यामुळे काळजी आहे. कामगारांच्यावतीने चर्चा करायला येणारे लोक चळवळ करणारे नाहीत. संघटनांचे पदाधिकारी नाहीत. एखाद्या ठिकाणी आंदोलन झालं तर आम्ही जात असतो. पण याचा अर्थ आम्ही त्या संघटनेचे नेते नसतो. असं सांगतानाच एसटी कामगारांचा प्रश्न चर्चेतून सुटेलही, पण करार कुणाशी करायचा हा प्रश्नच आहे, असं ते म्हणाले.