Special Report | साध्वींना हवंय हिंदुराष्ट्र, मनसेच्या मनात काय?
मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंच्या घरी साधु-संत पोहोचले. मात्र अनेकांना महिती नसलेल्या साध्वी कांचन गिरींचं मनसेचे इतकं जल्लोषात स्वागत का केलं? हा प्रश्न अनेकांना पडलं आहे.
मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंच्या घरी साधु-संत पोहोचले. मात्र अनेकांना महिती नसलेल्या साध्वी कांचन गिरींचं मनसेचे इतकं जल्लोषात स्वागत का केलं? हा प्रश्न अनेकांना पडलं आहे. शिवाय राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याऐवजी कांचन गिरी यांनी केलेल्या हिंदू राष्ट्राची भूमिका या निमित्ताने जास्त चर्चेत आली. हिंदू राष्ट्र व्हावं म्हणून त्यांनी देशभर दौरे सुरू केले आहेत. महाकाल मानव सेवा समितीच्या बॅनरखाली त्यांनी हे अभियान सुरू केलं आहे. त्यांनी देशातील अनेक भागात हिंदूराष्ट्र स्थापन्याचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. हिंदुराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी म्हणून त्यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेशासह विविध राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.