Saif Ali Khan Attack Video : सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?

| Updated on: Jan 16, 2025 | 11:42 AM

चोराकडून सैफ अली खानवर सहा वार करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तर झालेल्या या हल्ल्यात सैफ अली खानला दोन मोठ्या जखमा झाल्यात. यासोबतच मणक्यालाही मोठी दुखापत झाल्याचे समोर येत आहे. सैफ अली खानच्या घरात असलेल्या महिला नोकरही जखमी आहे.

मुंबईतील वांद्रे येथे राहत असलेल्या बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात मध्यरात्री एक चोर शिरला आणि त्याने अभिनेत्यावर चाकूने जोरदार हल्ला केला. चोराकडून सैफ अली खानवर सहा वार करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तर झालेल्या या हल्ल्यात सैफ अली खानला दोन मोठ्या जखमा झाल्यात. यासोबतच मणक्यालाही मोठी दुखापत झाल्याचे समोर येत आहे. सैफ अली खानच्या घरात असलेल्या महिला नोकरही जखमी आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र मुंबईतील वांद्रे येथे राहत असलेल्या इमारतीत १२ व्या मजल्यावर घर असताना चोराने एन्ट्री केली कशी? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेनंतर मुंबईच्या गुन्हे शाखा पोलिसांकडून यासंदर्भातील तपास सुरू आहे. या सैफ अली खानच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या इमारतीचीही तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीच्या शेजारी लहान दोन ते तीन मजली इमारत आहे. तिथे गुन्हे शाखेचे पोलीस दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा चोर नेमका कोणत्या रस्त्याने घरात शिरला असावा? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Published on: Jan 16, 2025 11:36 AM
Karad Custody Video : वाल्मिक कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ
Saif Ali Khan Attack Video : सैफची प्रकृती सध्या कशी? ‘लिलावती’कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?