Saif Ali Khan News Update Video : सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर
पाच दिवसांनंतर अभिनेता सैफ अली खानला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. तर बांगलादेशी हल्लेखोरा मोहम्मद शहाजादची चौकशी आणि तपासातून धक्कादायक माहिती समोर आली.
जवळपास पाच दिवसांनी सैफ अली खानला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. पांढरा शर्ट, निळी जीन्स आणि डोळ्यावर काळा गॉगल. कॅमेऱ्याकडे पाहून घरात शिरण्याआधी सैफनं हातवारे करत धन्यवादही दिले आणि थंब दाखवत ऑल इज वेल असल्याचं सांगितलं. राहत्या घरातच बांगलादेशी हल्लेखोर मोहम्मद शहाजादने हल्ला केल्यानंतर सैफ अली खान जखमी झाला होता. त्यानंतर पाच दिवस सैफ लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल होता. सैफ हॉस्पिटलमधून ऑटोने गेला आणि डिस्चार्ज नंतर कारने परतला. कारमधून येताना सैफनं स्माईल दिली. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ हल्ला झालेल्या सदगुरू शरण इमारतीत गेला नाही तर वांद्रेतील फॉर्च्युन हाइट या दुसऱ्या घरी गेला. सध्या सदगुरू शरण या इमारतीत पोलिसांकडून तपास आणि चौकशी सुरू आहे. त्यामुळे काही दिवस सैफ आणि करीना जुनी घरीच राहणार असल्याची माहिती आहे. तर आरोपी मोहम्मद शहाजादच्या चौकशीतून जी माहिती समोर आली त्यानुसार चोरीसाठी प्रवेश केलेलं घर सैफ अली खानचं आहे हे त्याला माहिती नव्हतं. सैफचं घर असून आपण सैफ अली खानवर हल्ला केल्याचं मीडियाच्या माध्यमातून समजलं असं शहाजादचं म्हणणं आहे. सदगुरू शरण इमारतीतील इतर घरांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा उघडा नव्हता. संपूर्ण इमारतीत फक्त सैफ अली खानच्या घराचा मागचा दरवाजा उघडा होता. मागचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत शहाजाद सैफ अली खानच्या घरात शिरला. धक्कादायक बाब म्हणजे सैफच्या इमारतीतील सीसीटीव्ही बंद होते. खाजगी सीसीटीव्हीत शहाजाद कैद झाला आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट