सैफ अली खानची 15 हजार कोटींची मालमत्ता जप्त होणार? काय आहे प्रकरण?

| Updated on: Feb 11, 2025 | 8:38 AM

अभिनेता सैफ अली खानची 15 हजार कोटींची मालमत्ता सरकार ताब्यात घेणार असल्याचं म्हटलं जातंय. ही संपत्ती शत्रू संपत्ती म्हणून घोषित करण्यात आली होती. शत्रू मालमत्ता कायदा म्हणजे काय, शत्रू संपत्ती कशाला म्हणतात याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया..

अभिनेता सैफ अली खानची 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार जप्त करणार असल्याचं कळतंय. त्याची ही मालमत्ता कुठे आहे, ती शत्रू संपत्ती ठरवली गेली का, शत्रू मालमत्ता कायदा म्हणजे काय, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहेत. भोपाळमधील पतौडी घराण्याच्या 15 हजार कोटींच्या वंशपरंपरागत मालमत्तेबद्दलचा हा वाद आहे. ही संपूर्ण मालमत्ता आता सरकारच्या ताब्यात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भोपाळमधील ही सगळी मालमत्ता सैफ अली खानच्या आजोबांशी संबंधित आहे. 2015 मध्ये भारत सरकारच्या ‘कस्टडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी’ या यंत्रणेनं ही मालमत्ता शत्रू संपत्ती म्हणून घोषित केली होती. त्यानंतर अभिनेत्री शर्मिला टागोर आणि त्यांचा मुलगा सैफ अली खान यांनी कोर्टात धाव घेतली होती. सैफची ही संपूर्ण संपत्ती सरकार ताब्यात घेणार की न्यायालय सैफच्या बाजूने निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Feb 11, 2025 08:38 AM
Mamta Kulkarni Video : ‘माझ्याकडे २ लाखांची मागणी अन् लक्ष्मी नारायण त्रिपाठींच्या दबाव…’, ममता कुलकर्णीचा खळबळजनक खुलासा
Rahul Solapurkar Video : शिवराय, आंबेडकरांवरील वादग्रस्त विधानानंतर माफीनामा, मात्र कारवाईऐवजी राहुल सोलापूरकरला सुरक्षा; कारवाई कधी?