Akash Thosar | ‘सैराट’ फेम परश्या उर्फ आकाश ठोसरला पाहण्यासाठी गर्दी

| Updated on: Sep 09, 2021 | 7:55 AM

परश्या उर्फ अभिनेता आकाश ठोसरला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाल्याचंही पाहायला मिळालं. सोलापुरातील एका खाजगी हॉटेलचे उद्घाटन करण्यासाठी परशाची उपस्थिती होती. यावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती

सैराट चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या आर्ची आणि परश्या यांची क्रेझ इतक्या वर्षांनंतरही कायम आहे. आर्चीची भूमिका करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु कुठल्या कार्यक्रमाला गेल्यानंतर उसळणारी गर्दी आपण पाहिली आहे. नुकतंच परश्या उर्फ अभिनेता आकाश ठोसरला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाल्याचंही पाहायला मिळालं. सोलापुरातील एका खाजगी हॉटेलचे उद्घाटन करण्यासाठी परशाची उपस्थिती होती. यावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला. गर्दीतल्या अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हता. सोलापुरातील जोडबसवणा चौकात हा प्रकार घडला.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 9 September 2021
Aurangabad Rain | पुराच्या पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न अंगलट, बैलगाडीच वाहून गेली