वकील कामगारांचे पोट भरणार नाही, एसटी संपावरून सदावर्तेंना संजय राऊतांचा टोला

| Updated on: Nov 26, 2021 | 1:08 PM

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आता भरघोस वेतनवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा कामावर रुजू व्हावे, त्यातच त्यांचे हीत असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आता भरघोस वेतनवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा कामावर रुजू व्हावे, त्यातच त्यांचे हीत आहे. गिरणी कामगारांची काय अवस्था झाली हे आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे जर उद्या काही समस्या निर्माण झाली, नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर कोणी वकील कर्मचाऱ्यांचे पोट भरण्यासाठी पुढे येणार नसल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

Published on: Nov 26, 2021 01:07 PM
BS Koshyari | हा महाराष्ट्र आहे, इथे मराठीतच बोललं पाहिजे; राज्यपाल कोश्यारींची आग्रही भूमिका
Anil Parab on Strike | कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संसक्षण देणार, अनिल परब यांची माहिती