VIDEO : Pune Road Issue | सासवड नगरपालिकेतील रस्त्यांची काम निकृष्ट दर्जाची, भाजपच्या साकेत जगतापांचा आरोप
सासवड येथील रस्त्यांची समस्या गेल्या अनेक दिवसांपासून होती. रस्त्याचे काम लवकर मार्गी लावावे अशी मागणी नागरिक सातत्याने सासवड नगरपालिकेकडे करत होते. सासवडवरून जेजुरीला जाण्याच्या रस्त्यावर देखील मोठे खड्डे पडल्याने नागरिकांसोबतच भाविकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत होता.
सासवड येथील रस्त्यांची समस्या गेल्या अनेक दिवसांपासून होती. रस्त्याचे काम लवकर मार्गी लावावे अशी मागणी नागरिक सातत्याने सासवड नगरपालिकेकडे करत होते. सासवडवरून जेजुरीला जाण्याच्या रस्त्यावर देखील मोठे खड्डे पडल्याने नागरिकांसोबतच भाविकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्याठिकाणी रस्त्याची संपूर्ण चाळण झाली होती. रस्त्या दुरूस्त करावा यामागणीसाठी नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशाराही नगरपालिकेला दिला होता. त्यानंतर रस्त्याचे काम झाले. मात्र, सासवड नगरपालिकेतील रस्त्यांची काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप भाजपच्या साकेत जगतापांनी केला आहे.
Published on: Aug 02, 2022 10:57 AM