मराठा समाजानंं पुढाकार घेऊन केली गांधीगिरी, थेट रस्त्यावर उतरून टोमॅटोची विक्री!

| Updated on: Aug 07, 2023 | 8:28 AM

VIDEO | मराठा समाजाकडून टोमॅटोची विक्री, टोमॅटो खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी, कुठं उतरले मराठा समाजातील तरूण रस्त्यावर?

नागूपर, ७ ऑगस्ट २०२३ | टोमॅटोचे दर गगनाला भिडले असून दोनशे ते अडीचशे रुपये किलो पर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला टोमॅटो घेणं कठीण झालंय. मात्र त्यावर ना सरकार ना कोणीच काही बोलताना दिसत नाही. त्यामुळे मराठा समाजाने पुढाकार घेत गांधीगिरी सुरू केली. मराठा समाजाकडून काल, रविवारी नागपूरच्या महाल परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ 90 रुपये किलो भावाने टोमॅटोची विक्री सुरू केली. विक्री सुरू होताच टोमॅटो घेण्यासाठी या ठिकाणी नागरिकांना लांबच लांब रांगा सुद्धा लागल्या. 90 रुपये किलो भावाने टोमॅटो मिळत असल्याचा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होता तर मराठा समाज मात्र गांधीगिरी करत आम्ही जर 90 रुपये किलोच्या भावाने टोमॅटो जनतेला देऊ शकतो तर मग सरकार का करत नाही, असा प्रश्न मराठा समाजाने उपस्थित केला.

Published on: Aug 07, 2023 08:28 AM
शिंदे गटाच्या आमदाराचा अपघात; ताफ्यातील पोलीस व्हॅनची कारला मागून धडक, किरकोळ दुखापत
अजित पवार गट अडचणीत येणार? शरद पवार गटाची केंद्रीय निवडणूक आयोगात याचिका