सलमान, सलीम खान यांना आलेलं धमकीचं पत्र TV9च्या हाती
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. हे लेटर सलीम खान यांच्या बॉडीगार्डला मिळालं आहे. धमकीचं हे पत्र आता टीव्ही 9च्या हाती लागलं आहे.
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. हे लेटर सलीम खान यांच्या बॉडीगार्डला मिळालं आहे. धमकीचं हे पत्र आता टीव्ही 9च्या हाती लागलं आहे. सलमान खान वॉकला जातो आणि जिथे ब्रेक घेतो त्या ठिकाणी हे पत्र आढळून आले आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, हे पत्र सलीम खानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना एका जागेवर सापडले आहे. ‘शलीम खान सलमान खान बहुत जल्द आपका मुसेवाला होता GB LB’ असा मजकूर यात लिहिलेला आहे.
Published on: Jun 06, 2022 01:27 PM