Salman Khan At Ahmedabad | दबंगहूड सलमान खानची अहमदाबादमध्ये गांधीगिरी
बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान याने आज महात्मा गांधीं यांच्या ऐतिहासिक साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी सलमानने चक्क बापूंचा चरखाही चालवला. लाडक्या ‘भाईजान’चा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान याने आज महात्मा गांधीं यांच्या ऐतिहासिक साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी सलमानने चक्क बापूंचा चरखाही चालवला. लाडक्या ‘भाईजान’चा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
यावेळी सलमानने हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. आश्रमाला भेट देऊन निघताना सलमानने व्हिजिटर बुकमध्ये आपला अभिप्राय लिहिला. त्याने लिहिले की, ‘मला इथे यायला खूप आवडले आणि हा आनंद मी कधीच विसरणार नाही. मला पहिल्यांदाच अशा ठिकाणी फिरायला मिळाले आहे. मला या आश्रमात पुन्हा यायला आवडेल.’