EID 2023: सलमान खानकडून मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा

| Updated on: Apr 22, 2023 | 6:56 PM

सलमान खाने याने ईदच्या निमित्ताने जमलेल्या सर्व चाहत्यांना घराच्या गॅलरीमध्ये येऊन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्याच्यासोबत मोठी सुरक्षा व्यवस्था असल्याचं दिसून आलं.

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान ( Salman Khan ) याने त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा ( Eid ) दिल्या आहेत. आपल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या ( Galaxy Apartment ) गॅलरीतून त्याने उपस्थित सर्व चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याच्या सोबत अनेक सुरक्षा रक्षक ( Salman Khan Security ) तैनात होते. सलमान खानला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. सलमान खान याला गेल्या अनेक दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे त्याची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. सलमान खान देखील त्याच्या सुरक्षेत मोठी काळजी घेत आहे. सलमान खानने गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीत उभा राहून चाहत्यांचे आभार मानले. सलमान खानचे वडील सलीम खान हे देखील त्याच्यासोबत उपस्थित होते. यादरम्यान सलमान खान निळ्या रंगाच्या पठाणी सूटमध्ये दिसत आहे. भाईजानचा लूक पाहून चाहते ही खूश झाले आहेत.

सलमान खानचे सुरक्षा रक्षक ( Salman Khan Bodyguards ) यावेळी त्याच्या मागेपुढे उभे असल्याचे दिसत आहे. ज्यामुळे भाईजानच्या सुरक्षा व्यवस्थेचा सहज अंदाज लावता येतो. ईदच्या मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे यावेळीही सलमान खानने गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर उपस्थित असलेल्या त्याच्या हजारो चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान‘ ( kisi ka bhai kisi ki jaan )हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

सलमान खान सध्या त्याला मिळत असलेल्या धमक्यांमुळे चर्चेत आहे. सलमान खानला लॉरेंस बिश्नोई गँगकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. अभिनेत्री राखी सावंतला ( Rakhi Sawant ) देखील नुकताच इमेल आला होता. ज्यामध्ये सलमान खानला मारण्याची धमकी ( Threat to salman khan ) देण्यात आली होती.

Published on: Apr 22, 2023 06:46 PM
अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा; संजय राऊत म्हणताय, ‘त्यांच्यात क्षमता पण लायकी नसलेले…’
Exclusive : नरहरी झिरवळ यांनी सांगितला जपान दौऱ्याचा अनुभव, स्वेटर घ्यायला गेलो पण किंमत ऐकून म्हणालो…