MSEB कर्मचाऱ्याला सलाम, 25 गावं 36 तासांपासून अंधारात अन् त्यानं 3 तास पाण्यात उभं राहून वीज पुरवठा केला सुरळीत
गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस असून या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला आहे. त्यात कशोरी परिसरात असलेल्या 25 गावांना या पुराचा फटका बसला आहे, यामुळे या परिसरातील गावातील वीज पुरवठा मागील 36 तासापासून खंडित झाला होता.
सरकारी काम आणि घडीभर थांब… याची प्रचिती सर्वसामान्य जनतेला असते. त्यातच दोन दिवसापासून बंद असलेला विद्युत पुरवठा कोण दुरुस्त करणार तेही भर पावसात… त्यातच विद्युत खांब पाण्याच्या वेढ्यात… पण विद्युत विभागचे कर्मचारी शेवटी धावून आले. गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस असून या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला आहे. त्यात कशोरी परिसरात असलेल्या 25 गावांना या पुराचा फटका बसला आहे, यामुळे या परिसरातील गावातील वीज पुरवठा मागील 36 तासापासून खंडित झाला होता. मात्र केशोरी येथील महावितरणच्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी साहस दाखवून एकमेकांच्या आणि दोरीच्या सहाय्याने तूडुंब वाहत असलेल्या दोन नाल्यातून वाट काढली आणि ते विद्युत विभागाच्या डीपीपर्यंत पोहोचले. पाण्यात तीन तास उभे राहून कौशल्य दाखवीत वीज पुरवठा सुरळीत केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून विद्युत महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक होत आहे.