Shiv Jayanti 2022 | कोरोना नियमांच पालन करुन शिवजयंती साजरी करुया : संभाजी छत्रपती

| Updated on: Feb 19, 2022 | 10:37 AM

रायगड प्राधिकरणच्यावतीनं जमीन संपादित केली आहे. तिथं शिवाजी महाराजांच्या कार्याची, त्यांच्या मावळ्यांची माहिती एका ठिकाणी कशी आणता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे, असं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले.

खासदार संभाजी छत्रपती यांनी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उपस्थिती लावली. कोरोना संसर्ग कमी होईल तसा उत्साह वाढत जाईल, असं संभाजी छत्रपती म्हणाले. रायगड प्राधिकरणच्यावतीनं जमीन संपादित केली आहे. तिथं शिवाजी महाराजांच्या कार्याची, त्यांच्या मावळ्यांची माहिती एका ठिकाणी कशी आणता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवाजी महाराजांच्यावर करण्यात आलेलं लेखन एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

Shiv Jayanti 2022 | सोलापूरमध्ये गुलाल उधळत शिवजन्मोत्सव साजरा
शिवजयंतीला मनमाडमध्ये उत्साहाने सुरुवात, पुतळ्याला आकर्षक सजावट