‘कोण जितेंद्र आव्हाड? त्यांना ओळखत नाही’, व्हिडीओप्रकरणी धारकरी हनमंतराव पवार थेटच म्हणाले अन्…

| Updated on: Aug 04, 2023 | 1:44 PM

VIDEO | 'तो व्हिडीओ खरा पण...', व्हायरल व्हिडीओप्रकरणी धारकरी हनमंतराव पवार यांचं स्पष्टीकरण, नेमका काय होता 'तो' व्हिडीओ?

सांगली, ४ ऑगस्ट २०२३ | शिवप्रतिष्ठानचे धारकरी आणि संभाजी भिडे यांचे निकटवर्तीय असणारे हनमंतराव पवार यांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. व्हायरल व्हिडीओप्रकरणी धारकरी हनमंतराव पवार यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, ‘माणसाच्या जीवनात चढउतार येत असतात. तसा चढउतार माझ्या जीवनात आला होता. त्यावेळीचे फोटो आणि व्हिडीओ आता व्हायरल करण्यात आले आहेत. आता जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो खरा आहे. मात्र तो 4 वर्षांपूर्वीचा आहे आणि मी भिडे गुरुजींच्या जवळ आहे आणि असतो म्हणून गुरुजींपासून लांब जावं यासाठी जाणीवपूर्वक तो जुना चार वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मी माझ्या व्यक्तिगत जीवनात माझे आई-वडील छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि संभाजीराव भिडे गुरुजी यांना माझे सर्वस्व आणि दैवत मानतो.’, असेही शिवप्रतिष्ठानचे धारकरी हनमंतराव पवार यांनी सांगितले. पुढे ते असेही म्हणाले की, ‘कोण जितेंद्र आव्हाड आम्ही त्यांना ओळखत नाही आणि जितेंद्र आव्हाड यांनी काय व्हिडिओ टाकलेत हे आम्हाला माहीत नाही, आम्ही जितेंद्र आव्हाड यांच्या व्हिडिओला मानत नाही असे हनमंतराव पवार यांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले.

Published on: Aug 04, 2023 01:44 PM
रविकांत तुपकर भाजपमध्ये जाणार? ‘या’ बड्या नेत्याने दिली थेट ऑफर
“औरंगजेब भारतीय मुस्लिमांचा हिरो होऊ शकत नाही”, विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस कडाडले