वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य, ड्रेस घातलेल्या महिलांनी…

| Updated on: Jun 30, 2024 | 5:44 PM

संभाजी भिडे यांनी पुण्यातील जेएम रोडवरील जंगली महाराज मंदिरात दर्शन घेतले. पुण्यात दाखल झाल्यानंतर भीडे गुरुजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होणार आहेत. यावेळी संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांना संबोधित केलं. तेव्हा वटपौर्णिमेबाबत त्यांनी हे विधान केलं आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अशातच त्यांनी वटसावित्रीच्या पुजेबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. दरम्यान, संभाजी भिडे यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी पुण्यातील जेएम रोडवरील जंगली महाराज मंदिरात दर्शन घेतले. पुण्यात दाखल झाल्यानंतर भीडे गुरुजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होणार आहेत. यावेळी संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांना संबोधित केलं. तेव्हा वटपौर्णिमेबाबत त्यांनी हे विधान केलं आहे. ते असेही म्हणाले की,ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. अशा 10 -10 हजरांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यात आपल्याला 10 हजरांची तुकडी करायची आहे. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोकं आपल्याला तयार करायची आहेत. आपल्या जे स्वातंत्र्य मिळाला ते हांडगं स्वातंत्र्य आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खर स्वातंत्र्य आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत.

Published on: Jun 30, 2024 05:43 PM
‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेसाठी कोण पात्र, कोण अपात्र? ‘ही’ मोठी अट, तरच मिळणार लाभ
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?