VIDEO : Manoj Aakhare | आम्ही फांद्या छाटण्यापेक्षा मुळावरच घाव करतो, मनोज आखरेंचे राज ठाकरेंना खुले आव्हान
संभाजी ब्रिगेड आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील वाद वाढणार असं दिसतंय. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीय राजकारणावरुन थेट राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं. तसेच यासाठी इतिसाहासाचाही आधार घेतला. आता संभाजी ब्रिगेडचे नेते ॲड. मनोज आखरे यांनी राज ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे.
संभाजी ब्रिगेड आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील वाद वाढणार असं दिसतंय. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीय राजकारणावरुन थेट राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं. तसेच यासाठी इतिसाहासाचाही आधार घेतला. यानंतर आता संभाजी ब्रिगेडचे नेते ॲड. मनोज आखरे यांनी आज मुंबईत थेट राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले. हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी आपल्याकडील इतिहास अभ्यासक, संशोधक आणावेत, आम्ही आमच्याकडील बहूजन समाजातील इतिहास अभ्यासक, संशोधक आणू आणि जाहीर चर्चा घडवून आणावी, असं मत मनोज आखरे यांनी व्यक्त केलं.