खासदार संभाजीराजे यांच्या डोळ्यात अश्रू

| Updated on: Feb 28, 2022 | 2:56 PM

खासदार संभाजी छत्रपती यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून उपोषणाला बसलेल्या संभाजी राजे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांचा चेहरा सुकलेला दिसत असून चेहऱ्यावर थकवा जाणवत आहे.

मुंबई: खासदार संभाजी छत्रपती यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून उपोषणाला बसलेल्या संभाजी राजे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांचा चेहरा सुकलेला दिसत असून चेहऱ्यावर थकवा जाणवत आहे. मात्र, सरकारकडून अजूनही कोणतंही ठोस आश्वासन देण्यात आलेलं नाही. संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तब्बल 12 मिनिटे 28 सेकंद त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं. बोलत असताना त्यांचा आवाज क्षीण झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (chhatrapati shivaji maharaj) दैदिप्यमान कार्यावर बोलत असताना अचानक त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यामुळे त्यांनी तात्काळ हाताने डोळे पुसण्यास सुरुवात केली.

रशिया आणि युक्रेनची बेलारुसमध्ये थोड्याच वेळात बैठक
Nashik Accident | टायर फुटल्यानं अपघात, संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली कार