Raosaheb Danve | संभाजी नगर शहर हे आमच्या मराठवाड्याचं रेल्वे इंजिन आहे – रावसाहेब दानवे
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. यावेळी नेहमीप्रमाणे दानवेंनी आपल्या भाषणात किस्से आणि जुन्या प्रसंगाची पेरणी केली.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसमोर यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तुफान फटकेबाजी केली. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. यावेळी नेहमीप्रमाणे दानवेंनी आपल्या भाषणात किस्से आणि जुन्या प्रसंगाची पेरणी केली.