अमित देशमुखांच्या भाजप प्रवेशाबाबत संभाजी पाटलांचा गौप्यस्फोट
मागील अनेक दिवसांपासून अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे भाजपात येणार अशी चर्चा होती. त्यावर नलंगेकर यांनी आम्हाला प्रिन्सची गरज नाही. भाजपमध्ये आम्ही त्यांना घेणार नाही आणि ते ही येणार नाही.
लातूर : भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर (MLA Sambhaji Patil Nilangekar) यांनी आमदार अमित देशमुख यांच्यांवर हल्लाबोल केलाय. अमित देशमुख यांना आम्ही भाजपमध्ये घेत नाहीत असे वक्तव्य त्यांनी केलंय. मागील अनेक दिवसांपासून अमित देशमुख आणि धीरज देशमुख (MLA Dhiraj Deshmukh) हे भाजपात येणार अशी चर्चा होती. त्यावर नलंगेकर यांनी आम्हाला प्रिन्सची गरज नाही. ते भाजपत येत नाही व आम्ही त्यांना घेणार नाही, अशी टीका केलीय. अमित देशमुख माजी मुख्यमंत्री विलास देशमुख यांचे सुपूत्र आहे.
Published on: Jan 12, 2023 10:19 AM