Sambhaji Raje | माझ्यावर छत्रपतींचे संस्कार, मराठा आरक्षणात कोणतीही तडजोड नाही : संभाजी राजे

| Updated on: Jun 27, 2021 | 8:35 PM

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी "आपल्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत, तडजोडीचे संस्कार नाही. मी मॅनेज होणाऱ्यातला नाही. मराठा आरक्षणात आता कोणतीही तडजोड नाही", असं वक्तव्य केलं आहे.

मराठा आरक्षणामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. वेगवेगळ्या नेत्यांकडून आगामी काळात आंदोलन, मोर्चे तसेच विराट रॅली काढणार असल्याचे सांगितले आहे. शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी आज मुंबईमध्ये विराट बाईक रॅलीचे आयोजन केले. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने काल (26 जून) राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी “आपल्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत, तडजोडीचे संस्कार नाही. मी मॅनेज होणाऱ्यातला नाही. मराठा आरक्षणात आता कोणतीही तडजोड नाही”, असं वक्तव्य केलं आहे.

Vijay Wadettiwar Uncut | माझं काहीही होवूदेत, ओबीसीच्या मुद्यावर शांत बसणार नाही – विजय वडेट्टीवार
Special Report | महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण घटले, तरी निर्बध का लादले गेले?