Loading video

संजय शिरसाटांकडून ‘लाव रे तो व्हिडीओ’, चंद्रकांत खैरेंच्या ‘नमाज’च्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोप

| Updated on: May 02, 2024 | 11:46 AM

संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांचा एक व्हिडीओ दाखवून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चंद्राकांत खैरे यांनी कुणाच्या चरणी हिंदुत्व गहाळ ठेवलं आहे? असा सवालही शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या टीकेवर चंद्रकांत खैरे यांच्याकडूनही प्रत्युत्तर, बघा काय केला पलटवार?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांचा एक व्हिडीओ दाखवून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चंद्राकांत खैरे यांनी कुणाच्या चरणी हिंदुत्व गहाळ ठेवलं आहे? असा सवालही शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या टीकेवर चंद्रकांत खैरे यांच्याकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पैशांच्या जोरावर शिरसाट दादागिरी करत असल्याचा आरोप खैरेंनी शिरसाटांवर केला आहे. दरम्यान, या आरोपांवर शिरसाटांनीही खैरेंना प्रत्युत्तर देत म्हटलंय, ‘चंद्रकांत खैरे यांनी चौकशी करावी, सर्वकाही समोर येईल. मी चौकशीला सामोरे जायला तयार आहे.’ यासह चंद्रकांत खैरे यांनी सहा वेळा जरी नमाज पठण केलं तरी त्यांना मतदान पडणार नाही, असा टोला संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांना लगावला आहे. बघा स्पेशल रिपोर्ट काय सुरू आहे आरोप-प्रत्यारोप?

Published on: May 02, 2024 11:46 AM
TV9 Exclusive : बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना मोदी भावूक, पंतप्रधानांची 2024 मधील महामुलाखत; आज रात्री 8 वाजता
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता… अजितदादांच्या वक्तव्यावरून चर्चा, राजकीय लढाई टोकाला