Sambhajiraje Chhatrapati | दौऱ्यावर असलेले छत्रपती संभाजीराजेंचं झाडाखालील बसून जेवण
संभाजीराजे यांचा साधेपणा पुन्हा एकदा दिसून आला. त्यांनी रस्त्यावरच एका शेतातील औतावरुन बसून जेवण केलं. संभाजीराजे यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसंच पीडितेला अभिवादन करुन ते मराठा आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करण्यासाठी औरंगाबादच्या दिशेनं निघाले. त्यावेळी संभाजीराजे यांचा साधेपणा पुन्हा एकदा दिसून आला. त्यांनी रस्त्यावरच एका शेतातील औतावरुन बसून जेवण केलं. संभाजीराजे यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.