Sambhaji Raje | कोणतंही आश्वासन सरकारने पाळलं नाही, संभाजीराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजी छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अल्टिमेटम देऊनही मराठा आरक्षणाबाबत या सरकारने काहीच केले नसल्याचं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजी छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अल्टिमेटम देऊनही मराठा आरक्षणाबाबत या सरकारने काहीच केले नसल्याचं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. तसेच येत्या 25 ऑक्टोबरपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचंही संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.
खासदार संभाजी छत्रपती यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. येत्या 25 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी दौरा करणार आहे. रायगडपासून या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. राज्य सरकारने आश्वासन देऊनही काहीच केलं नाही. सारथीचा एक मुद्दा सोडला तर इतर मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले.