Special Report | मुस्लीम असल्यानंच समीर यांना मुलगी दिली, वानखेडेंचे पहिले सासरे tv9 वर
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विट करुन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी समीर वानखेडे मुस्लिम आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या निकाहानाम्यामध्ये समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव समीर दाऊद वानखेडे असं आहे.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विट करुन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी समीर वानखेडे मुस्लिम आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या निकाहानाम्यामध्ये समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव समीर दाऊद वानखेडे असं आहे. आता समीर यांचे पहिले सासरे डॉ. जायेद कुरेशी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचित करताना मोठे गौप्यस्फोट केले. समीर वानखेडे यांचं कुटुंब मुस्लिमच असल्याचा दावा जायेद कुरेशी यांनी केला. धर्मांतर केल्यानंतर समीर वानखेडेंचे वडील दाऊद झाले होते, असंदेखील जायेद कुरेशी यांनी सांगितलं.