“सतत धमक्या येतायंत, मला संरक्षण …”, समीर वानखेडे यांनी व्यक्त केली हल्ल्याची भीती
VIDEO | सुरक्षा आणि 25 करोडच्या खंडणी आरोपांबाबत काय म्हणाले समीर वानखेडे ?
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची सध्या सीबीआय चौकशी सुरूये. सीबीआयच्या 2 दिवसांच्या तपासानंतर समीर वानखेडे यांच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होतेय. या सुनावणीला पोहोचत असताना समीर वानखेडे यांनी टीव्ही ९ मराठीकडे आपल्यावर होणाऱ्या हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सुरक्षेचा प्रश्न माझ्यासमोर आहे. मी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे सुरक्षेची मागणी करणार आहे. पोलिसांना असंही सांगण्यात आलं आहे. सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियावर सतत धमक्या येत आहेत. या सर्व विषयांवर मी मुंबई पोलीस आयुक्तांशी एकत्रित चर्चा करणार आहे, असंही वानखेडे म्हणालेत. मला सुरक्षा द्या अन्यथा माझ्यावर अतिक अहमदप्रमाणे हल्ला करू शकतो, असं समीर वानखेडे यांनी म्हटले आहे. यासह त्यांनी असेही म्हटले की, मी सीबीआयच्या तपासात सहकार्य करत आहे. माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. जे काही कायदेशीर आहे. ते मी न्यायालयात सांगणार आहे. सीबीआयला त्यांची बाजू मांडू द्या. आम्ही सीबीआयला शुभेच्छा देतो