Sameer Wankhede | समीर वानखेडे मुस्लीमच, मलिकांचा आरोप खरा, वानखेडेंच्या पहिल्या सासऱ्यांचा खुलासा
काल समीर वानखेडे यांनी बनावट कागदपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला आहे. त्यानंतर आज मलिक यांनी समीर वानखेडे आणि डॉ. शबाना यांचा निकाहनामाच मलिक यांनी समोर आणला. त्यात समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं.
मुंबई : मुंबई ड्रग्स केस आणि आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. काल समीर वानखेडे यांनी बनावट कागदपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला आहे. त्यानंतर आज मलिक यांनी समीर वानखेडे आणि डॉ. शबाना यांचा निकाहनामाच मलिक यांनी समोर आणला. त्यात समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं. दरम्यान, वानखेडे यांच्याकडून आईच्या इच्छेसाठी आपण तो निकाह केला होता. त्यानंतर स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार विवाह केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आता समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आलीय. समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊदच आहे. त्यांची मुलगी आणि जावईसुद्धा मुस्लिमच असल्याचं त्यांनी म्हटलंय.