समीर वानखेडे यांना फेक ट्विटरवरून धमकी, पत्नी क्रांती रेडकर म्हणाल्या…
VIDEO | समीर वानखेडे यांना फेक टि्वटरवरुन धमकी, सातत्याने येणाऱ्या धमक्यांबाबत काय उचणार वानखेडे पाऊल?
मुंबई : आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे चांगलेच अडचणीत सापडले होते. सीबीआयने समीर वानखेडे यांच्या विरोधात एक एफआरआर दाखल केला आहे आणि आज मुंबई हायकोर्टात त्यांचे म्हणणे सादर करणार आहे. असे असताना आजच्या दिवशी एक मोठी बातमी समोर आली आहे. समीर वानखेडे यांना पुन्हा सोशल मीडियावरून धमकी देण्यात आली आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे. सातत्याने सोशल मीडियावरून येणाऱ्या धमकीप्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार असल्याचं क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे. तर पुढे क्रांती रेडकर यांनी असे म्हटले, अशा धमक्या ज्याला ट्रोल म्हटलं जातं हे खूप आधीपासून होत आहे पण त्याकडे आम्ही दुर्लक्ष करत होतो. मात्र आता ट्विटकवरून धमकी देण्यात आली आहे. इतकंच नाही तर दोन इंटरनॅशनल ट्विटर अकाउंट आहेत त्यावरून समीर वानखेडे यांना धमकी देण्यात आली आहे. त्या अकाउंट वरील लोक दाऊद यांचं नाव घेऊन धमक्या देत आहे. विशेष म्हणजे भारतासह भारत सरकारला शिवीगाळ करत आहे, माझ्या पतीला आणि आमच्या मुलांना शिवीगाळ करत आहे. यामुळे आमच्या जीवाला काही झालं तर काय करणार असा विचारही मनात येतो, त्यामुळे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.