नवाब मलिक माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी करतात, वानखेडेंचे आरोप
माझ्या कुटुंबाची आणि माझ्याबद्दलची वैयक्तिक माहिती नवाब मलिक ट्विटरवर करत नाहक मानहानी करत आहेत. हे माझ्या कौटुंबिक गोपनीयतेचा भंग करणारे आहे, असं समीर वानखेडे म्हणाले.
“माझ्या कुटुंबाची आणि माझ्याबद्दलची वैयक्तिक माहिती नवाब मलिक ट्विटरवर करत नाहक मानहानी करत आहेत. हे माझ्या कौटुंबिक गोपनीयतेचा भंग करणारे आहे. माझी,माझ्या कुटुंबाची, वडील आणि आईची प्रतिमा मलीन करण्याचा हेतू दिसत आहे. नवाब मलिक यांचं मागच्या काही दिवसातील कृत्य माझ्या कुटुंबाला मानसिक आणि भावनिक त्रास देणार ठरतंय. कुठल्याही कारणाशिवाय नवाब मलिक हे ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, त्याने मला दुःख होतंय” अशा भावना वानखेडेंनी व्यक्त केल्या आहेत, असं समीर वानखेडे म्हणाले आहेत.