Sameer Wankhede यांच्या अडचणीत वाढ होणार? वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी सुरु

| Updated on: Nov 18, 2021 | 3:34 PM

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आज तीन गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकले. आधीच्या पत्नीच्या नातेवाईकालाही खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आज तीन गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकले. आधीच्या पत्नीच्या नातेवाईकालाही खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केला. दाऊद वानखेडेंचा फर्जीवाडा समोर येत आहे. एक आयपीएस अधिकारी त्यांचा शेजारी होता. त्यांच्याशी त्यांचं बिनसलं. त्यांनी या अधिकाऱ्याच्या मुलाला एका गुन्ह्यात फसवलं. त्या मुलाच्या कुटुंबीयाने बेल अॅप्लिकेशन केली. त्यात एनसीबीचा कोणताही अधिकारी घरी आला नाही. त्या मुलाला घरातून बोलावण्यात आलं. खोटा गुन्हा तयार करून त्याला अटक केली गेली. ज्या मुलाला फसवलं त्याचे वडील आयपीएस अधिकारी आहे. शेजाऱ्याशी भांडण झालं म्हणून त्याला अटक केली, असं मलिक म्हणाले.

Anil Parab | रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना नोटीस, 24 तासानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ : अनिल परब
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 18 November 2021