समित कदम भडकले; अनिल देशमुखांचं डोकं फिरलंय, माझ्याकडे शब्द नाहीत अन्…
'अनिल देशमुखांनी माझे-देवेंद्र फडणवीसांसोबत असलेले फोटो दाखवले. यात नवीन काहीच नाही. माझे फेसबुक, इन्स्टाग्रामवर यावर जे काही फोटो आहेत, तेच फोटो त्यांनी दाखवले. त्यांनी त्यात काही हेरगिरी केलेली नाही, असे वक्तव्य करत समित कदम आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले'
ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी यांचा प्रस्ताव घेऊन समित कदम हे माझ्याकडे आले होते, असा खळबळजनक दावा अनिल देशमुखांनी केला आहे. यानंतर आज समित कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अनिल देशमुखांनी माझे-देवेंद्र फडणवीसांसोबत असलेले फोटो दाखवले. यात नवीन काहीच नाही. माझे फेसबुक, इन्स्टाग्रामवर यावर जे काही फोटो आहेत, तेच फोटो त्यांनी दाखवले. त्यांनी त्यात काही हेरगिरी केलेली नाही, असे वक्तव्य करत समित कदम आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पुढे ते असेही म्हणाले, २०१६ पासून माझा जनसुराज्यशक्ती हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे. मी त्याचा राज्याचा अध्यक्ष आहे. आम्ही NDA चे घटक पक्ष झाल्यानंतर पक्षाच्या कामानिमित्त आम्हाला वेगवेगळ्या बैठकीत निमंत्रण दिलं जातं. पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातील विविध बैठकींसाठी आम्हाला बोलवलं जातं. त्यात फडणवीसांची भेट होते. त्यासोबत इतर पक्षातील नेत्यांचीही भेट होते. त्यामुळे यात काही मोठं सांगितल्यासारखं मला वाटत नाही. त्यांनी दाखवलेले फोटो हे जगजाहीर आहेत, असेही समित कदम म्हणाले.