समनापूरच्या वादावर प्रसिद्ध वडापाव विक्रेते अन्सार चाचा म्हणाले, ‘माझी प्रेमाने विनंती आहे, मायबाप…’
VIDEO | अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील दगडफेकीनंतर अन्सार चाचांनी काय केलं आवाहन?
अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात आज दोन गटात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. संगमनेरमध्ये काल सकाळी मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा दुपारी साडेबारा वाजेपर्यंत संपला. त्यानंतर मोर्चात सहभागी झालेले आपापल्या घरी परतत असताना संगमनेर तालुक्यापासून 5 ते 6 किमी अंतरावर असलेल्या समनापूर गावात दोन गटात वाद झाल्याची घटना घडली. बंधित घटना नेमकी कशी घडली याविषयी सनमापूरचे प्रसिद्ध वडापाव विक्रेते अन्सार चाचा यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली आणि नागरिकांना प्रेमाने आवाहन केले. न्सार चाचा यांचं समनापूरमध्ये वडापावचं प्रसिद्ध दुकान आहे. अन्सार चाचा यांचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जसा मी जन्माला आलो, जसं मला समजायला लागलं, तेव्हापासून आजपर्यंत आमच्या गावात सर्व एकदम गोड गुलाबीने, आनंदाने राहतोय. आमच्यात कधीच भांडण झालं नाही. आज जे झालंय, हे जे गालबोट लागलंय, याला फक्त बाहेरचे लोक कारणीभूत आहेत. माझी प्रेमाने विनंती आहे की, कमीत कमी मायबाप भांडणं करु नका. गोडी गुलाबीने, चांगल्याप्रकारे राहा अशी अपेक्षा बाळगतो. प्रचंड वेगाने शांतता राखा, असं अन्सारी चाचा म्हणाले