Samruddhi Mahamarga : समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होणार, tv9मराठीला माहिती

| Updated on: Apr 05, 2022 | 1:18 PM

समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा  1 मे ला सुरु होणार असल्याची माहिती tv9मराठीला सूत्रांकडून मिळाली आहे. नागपूर-शिर्डीदरम्यान समृद्धी महामार्ग जूनमध्ये होण्याची शक्यता आहे.

मुंबई : समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Mahamarga) पहिला टप्पा  1 मे ला सुरु होणार असल्याची माहिती tv9मराठीला सूत्रांकडून मिळाली आहे. नागपूर-शिर्डीदरम्यान समृद्धी महामार्ग जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्यात मोठा गाजावाजा झालेला मुंबई ते नागपूरपर्यंतचा 710 किलोमीटर लांबीचा, सहा पदरी हा समृद्धी महामार्ग आहे. एकूण 10 जिल्हे, 27 तालुके आणि 392 गावातून हा महामार्ग जाणार आहे. सुरुवातीला म्हणजे चारवर्षापूर्वी साधारण 40 हजार कोटींचा हा प्रकल्प होता. आता त्याची किंमत 56 हजारा कोटींच्या पुढे गेली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या (devendra fadnavis) मुख्यमंत्रिपदाच्या काळात म्हणजेच 7 सप्टेंबर 2016 रोजी या महामार्गाची अधिसूचना काढण्यात आली. नागपूर ते मुंबईपर्यंतचा हा समृद्धी महामार्ग भारतातील पहिला आणि जगातील तिसरा सर्वात मोठा महामार्ग आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातल्या नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा,जालना औरंगाबाद (Aurangabad),अहमदनगर,नाशिक ठाणे या दहा जिल्ह्यातून जाणार आहे.

Published on: Apr 05, 2022 01:18 PM