मराठी महिलेला घर नाकारलं, पंकजा मुंडे यांनी काय सांगितला स्वानुभव म्हणाल्या, ‘सरकारी घर सोडलं तेव्हा मला…’

मराठी महिलेला घर नाकारलं, पंकजा मुंडे यांनी काय सांगितला स्वानुभव म्हणाल्या, ‘सरकारी घर सोडलं तेव्हा मला…’

| Updated on: Sep 29, 2023 | 5:13 PM

VIDEO | 'माझं सरकारी घर सोडून दुसरं घर घ्यायचं होतं, तेव्हा मला देखील असा अनुभव आला हे फार दुर्दैवी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीलाही असा अनुभव आला हे खरंच दुर्दैवी आहे' असे वक्तव्य करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काय सांगितला स्वतःवर आलेला प्रसंग, बघा व्हिडीओ

मुंबई, २९ सप्टेंबर २०२३ | सरकारी घर सोडून जेव्हा घर घ्यायची वेळ आली, तेव्हा मलाही अशाच प्रकारच्या वागणुकीला सामोरे जावं लागल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज माध्यमासमोर सांगितले. पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. “माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं. तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी लोकांना आम्ही घर देत नाही. माझ्यासारख्या व्यक्तीलाही असा अनुभव आला. हे फार दुर्दैवी आहे. आत्ताचं राजकारणातलं वातावरण, सगळं समाजातलं वातावरण हे सगळं पाहता कुठेतरी अस्वस्थता वाटत असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्य या वक्तव्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशपांडे म्हणाले, पंकजा मुंडे यांनी उशिरा प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी त्यांना जो अनुभव आला तेव्हा त्यांनी सांगितलं असतं तर मनसैनिकांनी पंकजा मुंडे यांना तेव्हाच घर मिळवून दिलं असतं.

Published on: Sep 29, 2023 05:12 PM
दिवाळीनंतर कत्तल की रात होणार? प्रकाश आंबेडकर यांनी काय केलं सूचक भाष्य?
Gautami Patil हिच्या अडचणी वाढणार? अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल, पण का?