‘लाडक्या बहिणी’चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा

| Updated on: Nov 21, 2024 | 5:02 PM

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी संदीप देशपांडे यांनी मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडत असताना वरळीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बनावट स्वाक्षरीचं एक पत्र व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आशय होता.

लाडक्या बहिणींचे भाऊ चीटर आहे, असे म्हणत मनसे नेते आणि वरळी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. तर वरळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं बनावट पाठिंबा पत्र तयार केल्याचा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी संदीप देशपांडे यांनी मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडत असताना वरळीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बनावट स्वाक्षरीचं एक पत्र व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आशय होता. मात्र हे पत्र बनावट असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. याप्रकरणी संदीप देशापांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिदें गटाकडून मिलिंद देवरा हे उमेदवार वरळीतून उभे आहेत. ज्यावेळी त्यांना कळलं त्यांना मतं मिळत नाहीये. त्यावेळी राज ठाकरेंच्या खोट्या सहीचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं. ज्यामध्ये मनसेने शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला आहे. सर्व लोकांनी मिलिंद देवरा यांना मतदान करावं.’, असं त्या बनावट पत्रात नमूद असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटलं. तर लाडकी बहीण लाडकी बहीण करता हे लाडक्या बहिणींचे भाऊ चीटर आहेत, शिंदे साहेबांचा प्रचंड दबाव होता हे जाणवलं. याप्रकऱणी पोलिसांत गुन्हा दाखल करायाला गेलो तेव्हा ते गुन्हा दाखल करून घ्यायाला तयार नसल्याचे म्हणत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

Published on: Nov 21, 2024 05:02 PM
Sanjay Shirsat : राज्यात ‘गुवाहाटी पार्ट-2’ होणार? ‘गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर…’, संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
‘आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी’, आमदारांच्या हॉटेल बुकिंगवरील ‘त्या’ वक्तव्यावर भाजपच्या प्रवीण दरेकरांचा टोला