Video : “तुरुंगातून लेख कसा काय लिहिला? स्वातंत्र्य सैनिक आहात काय?”, संदिप देशपांडेंचा राऊतांना सवाल

| Updated on: Aug 07, 2022 | 11:41 AM

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक महिना लोटला तरी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. आमदार रविकांत तुपकर यांनीही आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी मोर्चे काढायचे का? असा इशारा राज्यातील सत्ताधाऱ्यांना दिला आहे. 36 दिवस उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? असा सवालही त्यांनी […]

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक महिना लोटला तरी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. आमदार रविकांत तुपकर यांनीही आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी मोर्चे काढायचे का? असा इशारा राज्यातील सत्ताधाऱ्यांना दिला आहे. 36 दिवस उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. आता मनसेनेही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा. लोकांची सहनशक्ती संपत चालली आहे, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिला आहे. तुरुंगातून लेख लिहायला संजय राऊत (Sanjay Raut) हे काय स्वातंत्र्य सैनिक आहेत काय? असा सवालही देशपांडे यांनी केला

 

 

Published on: Aug 07, 2022 11:41 AM
Virar : विरारमध्ये चायनीजच्या दुकानात स्फोट, एक जखमी
आज Friendship Day!, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन मित्रांनी एकत्र यावं- शहाजीबापू पाटील