Sandeep Deshpande : …तर राजकारण सोडून देईल, मनसे नेते संदीप देशापांडेंचंं आव्हान
अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर संदीप देशपांडे पहिल्यांदाच मीडियाच्या समोर आले आहेत.
मुंबई: मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनात महिला पोलिसांना धक्का लागल्यानंतर मनसेचे (mns) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी हे गायब झाले होते. मात्र, या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर संदीप देशपांडे पहिल्यांदाच मीडियाच्या समोर आले आहेत. यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. आम्ही महिला पोलिसांना धक्का दिला नाही. आमच्या धक्क्याने महिला पोलीस जमिनीवर कोसळल्या नाहीत. महिला पोलिसांना आम्ही धक्का दिल्याचं एक तरी फुटेज दाखवल्यास मी आताच राजकारण सोडून देईन, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. आम्ही पळून गेल्याचं सर्व सांगत होते. आम्ही गायब झालो आहोत असं सांगत होते. आम्ही जर गायब झालो होतो असं म्हणता तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (anil deshmukh) कुठे लपवले होते? अनिल देशमुख तर गृहमंत्री होते. मग आमचीच बदनामी का? असा सवाल देशपांडे यांनी केला.