VIDEO : Sandeep Deshpande मुंबईत परतल्यावर राज ठाकरेंची भेट घेणार
मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं हा जामीन मंजूर केला आहे. अटकपूर्व जामीन दिल्यानंतर आता संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी यांना पोलीस चौकशीला सहकार्य करावं लागणार आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यालायानं मोठा दिलासा दिला आहे. मुंबईत परतल्यानंतर संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं हा जामीन मंजूर केला आहे. अटकपूर्व जामीन दिल्यानंतर आता संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी यांना पोलीस चौकशीला सहकार्य करावं लागणार आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यालायानं मोठा दिलासा दिला आहे. मुंबईत परतल्यानंतर संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सरकारी कामात अडथळ आणल्याप्रकरणी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर अटक करण्यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेल्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा कोणताही थांगपत्ता पोलिसांना लागू शकलेला नव्हता. अखेर आता जामीन मंजूर झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी समोर येण्याची शक्यता आहे.