‘ठाकरेंसोबतचे आणखी 2 आमदार फुटणार’; मंत्री संदिपान भुमरेंचा दावा
मंत्री संदिपान भुमरे यांनी औरंगाबादमध्ये मोठा दावा केला आहे. ठाकरेंसोबतचे आणखी दोन आमदार फुटणार, असं ते म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना यावेळी आणखी मोठा धक्का बसणार असल्याचं म्हटलं जातंय.
मंत्री संदिपान भुमरे यांनी औरंगाबादमध्ये मोठा दावा केला आहे. ठाकरेंसोबतचे आणखी दोन आमदार फुटणार, असं ते म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना यावेळी आणखी मोठा धक्का बसणार असल्याचं म्हटलं जातंय. त्याचप्रमाणे ते नेमके दोन आमदार कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एक आमदार आम्हाला भेटला असून दुसरा संपर्कात असल्याचा दावा संदिपान भुमरे यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का होता. त्यानंतर आता ठाकरे गटातून आणखी दोन आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.
Published on: Aug 28, 2022 12:09 PM