जरांगेंना फक्त शरद पवारांचा फोन अन् त्यांनाच ते विश्वासात घ्यायचे, बारसकरांनंतर कुणाचे सनसनाटी आरोप?

| Updated on: Feb 23, 2024 | 12:33 PM

संगीता वानखेडे यांनीही जरांगे पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. जरांगे पाटील यांच्यामागे शरद पवार असल्याचा सनसनाटी आरोप संगीता वानखेडे यांनी केलाय. तर अजय महाराज बारसकर यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर जरांगे पाटलांनीही प्रत्युत्तर दिलंय. जरांगे म्हणाले...

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४ : अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आणि त्यानंतर संगीता वानखेडे यांनीही जरांगे पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. जरांगे पाटील यांच्यामागे शरद पवार असल्याचा सनसनाटी आरोप संगीता वानखेडे यांनी केलाय. तर अजय महाराज बारसकर यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर जरांगे पाटलांनीही प्रत्युत्तर दिलंय. जरांगे म्हणाले, ‘बारसकर यांनी एका महिलेवर विनयभंगाचा आरोप केला असून त्या प्रकरणातून वाचण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा एक प्रवक्ता आणि फडणवीस यांच्या जवळच्या नेत्यानं हा ट्रॅप रचला. तसेच माझ्याविरूद्ध बोलण्यासाठी बारसकरने ४० लाख रूपये घेतले’, असा पलटवार जरांगे पाटील यांनी केला. बारसकरांनंतर मराठा आंदोलनकर्त्या संगीता वानखेडे यांनीही जरांगेंना घेरलंय. जरांगेंच्या मागे शरद पवार असून त्यांचेच फोन जरांगेंना येतात, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 23, 2024 12:33 PM
जीवाला जीव देणारे शिवसैनिक…, उद्धव ठाकरे यांची मनोहर जोशी यांना श्रद्धांजली
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? भाजप-काँग्रेसकडून कुणाची नावं आघाडीवर?