Sangli | सांगलीच्या शिराळा येथे सापडले तब्बल 19 जिवंत नाग, वन विभागाकडून कारवाई
सांगलीच्या शिराळा येथे तब्बल 19 जिवंत नाग एका फार्महाऊसवर सापडले आहेत. शिराळ्याच्या वन विभागाने ही कारवाई केली आहे. मडकी आणि पोती पिशवीमध्ये बंदिस्त करुन ठेवलेले 19 नाग वन विभागाने कारवाई करत जप्त करुन नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीच्या शिराळा येथे तब्बल 19 जिवंत नाग एका फार्महाऊसवर सापडले आहेत. शिराळ्याच्या वन विभागाने ही कारवाई केली आहे. मडकी आणि पोती पिशवीमध्ये बंदिस्त करुन ठेवलेले 19 नाग वन विभागाने कारवाई करत जप्त करुन नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निनावी दूरध्वनी वरुन फार्महाऊसमध्ये नाग बंदिस्त करुन ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्याचे प्रदर्शन होणार असल्याची माहिती वनविभागाला समजली.त्यामुळे ही माहिती मिळताच शिराळा येथील वनक्षेत्रपाल वनपाल वनरक्षक आणि सांगलीतील वनविभागाचे पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी काही लोक त्या ठिकाणाहून पळून गेले होते. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी मडकी पोती पिशवी ठेवलेल्या 19 नाग आढळून आले.