Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?

| Updated on: Nov 19, 2024 | 5:42 PM

विनोद तावडे यांच्याकडून पैशांचं वाटप करण्यात आलं असून विनोद तावडे यांच्या बॅगेत 5 कोटी रुपये असल्याचा आरोप ठाकूर पिता-पुत्रांनी केला आहे. मात्र हे सर्व आरोप विनोद तावडे यांनी फेटाळले आहेत. अशातच भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पैसे वाटप केल्याची माहिती समोर येत आहे.

विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांनी गंभीर आरोप केले. विनोद तावडे यांच्याकडून पैशांचं वाटप करण्यात आलं असून विनोद तावडे यांच्या बॅगेत 5 कोटी रुपये असल्याचा आरोप ठाकूर पिता-पुत्रांनी केला आहे. मात्र हे सर्व आरोप विनोद तावडे यांनी फेटाळले आहेत. अशातच भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पैसे वाटप केल्याची माहिती समोर येत आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप तमनगौडा रवी पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघातील तमनगौडा रवी पाटील हे भाजपचे नेते आणि माजी सभापती आहेत. दरम्यान, या आरोपांवर गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तमनगौडा रवी पाटील हा मनोरूग्ण माणूस आहे. तमनगौडा रवी पाटील यांना २३ तारखेला मनोरूग्णालयात भरती करणार असं प्रत्युत्तर गोपीचंद पडळकर यांनी दिलंय. तर पैसे वाटल्याच्या आरोपांवर उत्तर देताना गोपीचंद पडळकर म्हणाले, पोलिसांनी तमनगौडा रवी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणीही केली आहे.

Published on: Nov 19, 2024 05:42 PM
Uddhav Thackeray : ‘हा ‘नोट जिहाद’ आहे का? पैसा बाटेंगे आणि …’, विनोद तावडे प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
Shriniwas Pawar : शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवार यांनी सांगितली इनसाईड स्टोरी