विरोधी पक्षानं सरकारला मदत करायला हवी, मात्र ते टीका करतात, जयंत पाटील यांचं वक्तव्य
राज्यात अतिवृष्टीमुळं संकट निर्माण झालं आहे यातून मार्ग कसा काढायचा या साठी विरोधीपक्षाने सरकारला मदत केली पाहिजे. पण ते आता टीका करत असतील तर राजकारण कोण करत आहे हे समजते, असं जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात परवा पासून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. चिपळूणमध्ये सुद्धा पाऊस पडला आहे. राज्यात अतिवृष्टीमुळं संकट निर्माण झालं आहे यातून मार्ग कसा काढायचा या साठी विरोधीपक्षाने सरकारला मदत केली पाहिजे. पण ते आता टीका करत असतील तर राजकारण कोण करत आहे हे समजते, असं जयंत पाटील म्हणाले. केद्रं सरकारने किती मदत केली हे माहित नाही पण नक्कीचं केद्रं सरकार मदत करेल, असं जंयत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांनी सांगलीच्या शिरगावमध्ये बोटीतून पूरस्थितीची पाहणी केली.