Sangli | कुस्ती आखाड्याच्या उद्घाटनात जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांची टोलेबाजी

| Updated on: Oct 18, 2021 | 12:47 AM

खानापूर मतदारसंघाच्या बाबतीत मी बोलणार नाही. त्यामुळे आखाड्याच्या कार्यक्रमात राजकीय आखाडा व्हायला नको. जयंत पाटील यांची करेक्ट कार्यक्रमची मुलाखत चांगलीच रंगली होती. पण खरं सांगायचं झालं तर ते तसे नाहीत. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मागे ते खंबीरपणे उभे असतात, अशी टीप्पणी विश्वजित कदम यांनी केली.

मुंबई : जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा-भाळवणी येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रकुल कुस्ती संकुल उभारण्यात येत आहे. या कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यात मिश्कील टोलेबाजी पहावयास मिळाली. या दोघांनीही भाषणादरम्यान एकमेकांवर मोकळ्या मनाने टोलेबाजी केली.

जयंत पाटील यांची करेक्ट कार्यक्रमची मुलाखत चांगलीच रंगली 

खानापूर मतदारसंघाच्या बाबतीत मी बोलणार नाही. त्यामुळे आखाड्याच्या कार्यक्रमात राजकीय आखाडा व्हायला नको. जयंत पाटील यांची करेक्ट कार्यक्रमची मुलाखत चांगलीच रंगली होती. पण खरं सांगायचं झालं तर ते तसे नाहीत. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मागे ते खंबीरपणे उभे असतात, अशी टीप्पणी विश्वजित कदम यांनी केली. जयंत पाटील यांच्या करेक्ट कार्यक्रम या प्रसिद्ध अशा वक्तव्याचा विश्वजित कदम यांनी विशेष उल्लेख केला.

Published on: Oct 18, 2021 12:47 AM
Special Report | शरद पवारांची टीका…पंकजांचा चिमटा
Special Report | केरळमधील पावासाचे थैमान, पर्यटनस्थळं पुढील सूचनेपर्यत बंद