मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंना धमकी अन् गाडीवर शाईफेक; नेमकं घडलंय काय?

| Updated on: Apr 28, 2024 | 12:48 PM

सांगली लोकसभा मतदार संघातील निवडणुकीतील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार पाहायला मिळाला. इतकंच नाहीतर अज्ञातांकडून त्यांच्या गाडीवर शाईफेक करत चप्पलांचा हार देखील घालण्यात आला आहे. गाडीच्या बोनेटवर एक पत्रक लावण्यात आलं असून त्यात धमकी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी माघार घेतली तू ही माघार घे, मराठ्यांच्या नांदी लागू नको, अन्यथा…अशा आशयाचं एक पत्रक लिहून सांगली लोकसभा मतदार संघातील निवडणुकीतील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार पाहायला मिळाला. इतकंच नाहीतर अज्ञातांकडून त्यांच्या गाडीवर शाईफेक करत चप्पलांचा हार देखील घालण्यात आला आहे. गाडीच्या बोनेटवर एक पत्रक लावण्यात आलं असून त्यात धमकी वजा इशारा देण्यात आला आहे. ‘प्रकाश शेंडगे तुला मराठा समाज पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही. भुजबळाने जशी नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये माघार घेतली. तशी तू माघार घे आणि मराठ्यांच्या नादी लागू नका नाही तर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मराठ्याला विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेला हार गळ्यात घालू.. एक मराठा लाख मराठा ‘, असे त्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ग्रेट मराठासमोर त्यांची गाडी उभी असताना शनिवारी रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

Published on: Apr 28, 2024 12:48 PM
अनेक मतदारसंघात जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा अजितदादांवर घणाघात
पण मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, शेंडगेंच्या गाडीवरील शाईफेक प्रकरणानंतर भुजबळांची प्रतिक्रिया