स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एका टेलरने आपली कला दाखवत कमाल केली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजेत एका टेलर व्यवसायिकाने चक्क बटणांचा तिरंगा कुर्ता शिवल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या या कुर्त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. मिरजेत एका टेलरने सुमारे 14 हजार बटणांचा वापर करून हा तिरंगा कुर्ता बनवला आहे. इम्रान मलिदवाले असे या टेलरचे नाव असून त्याने हा बटणांचा तिरंगा कुर्ता शिवला आहे. मिरज शहरामध्ये इम्रान मलिदवाले याचं स्टाईल अप हे कपडे शिवण्याचे दुकान आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने टेलर व्यवसायाच्या देशप्रेम आणि देशाच्या जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी इमरान मलिदवाले यांनी हा कुर्ता शिवला आहे. तब्बल 14 हजार बटणांचा हा तिरंगा कुर्ता शिवण्यासाठी त्याला पाच दिवस लागले आहेत.